महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दूध भुकटी आयात निर्णय रद्द करा!; 'स्वाभिमानी'चा हिंगोलीत ट्रक पेटवण्याचा प्रयत्न

हिंगोलीकडे दूध घेऊन जाणाऱ्या ट्रकला पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. अचानक ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. या प्रकरणी अजून तरी कोणतीही नोंद झालेली नाही.

agitation-of-swabhimani-shetkari-sanghatana-at-hingoli
'स्वाभिमानी'चा हिंगोलीत ट्रक पेटवण्याचा प्रयत्न

By

Published : Jul 20, 2020, 7:25 PM IST

हिंगोली- केंद्रसरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोलीकडे दूध घेऊन जाणारा ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

'स्वाभिमानी'चा हिंगोलीत ट्रक पेटवण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत बळीराजा देखील चांगलाच हतबल झालेला आहे. शेतात खरिपाची पेरणी मोठ्या जोमाने केली. मात्र तीन वेळा पेरणी करुनही बऱ्याच शेतात पिकाची उगवण झालेली नाही. अशात बरेच शेतकरी हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र दुधाला देखील भाव नसल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळत आहे. असे असताना देखील केंद्र सरकाराने 23 जूनला दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करावा, 30 हजार दूध पावडरचा बफर स्टॉक करावे, निर्यात अनुदान प्रति किलो 30 रुपये देण्यात यावे, दूध, पावडर, बटर इतर दुग्धजन्य पदार्थाची जीएसटी पूर्णपणे रद्द करावी. तसचे पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान जमा करावे, अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.

यावेळी हिंगोलीकडे दूध घेऊन जाणाऱ्या ट्रकला पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. अचानक ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. या प्रकरणी अजून तरी कोणतीही नोंद झालेली नाही. मात्र ट्रक पेटवून देण्यासाठी देताना आंदोलक चांगलीच खबरदारी घेत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details