महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोरेगाव तालुका निर्मितीसाठी भरपावसात काढला मोर्चा; गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मागणी - भरपावसात मोर्चा

मागील अनेक वर्षांपासून गोरेगाव तालुका कृती समितीच्यावतीने प्रशासनाकडे गोरेगाव तालुका करण्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, अद्याप याकडे लक्ष न घातल्याने पुन्हा आज कृती समितीच्यावतीने भर पावसात मोर्चा काढून गोरेगाव तालुका निर्मिती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

हिंगोली

By

Published : Jul 30, 2019, 6:22 PM IST

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून या गावाला परिसरातील अनेक गावे जोडलेली आहेत. एवढेच नव्हे तर हे गाव ओलांडून तीस ते पस्तीस किमीचे अंतर कापत तालुका ठिकाणी जावे लागते. दळणवळणाचे साधन पाहता शासन योजनेचा लाभ या विभागातील ग्रामस्थांना होत नाही. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून गोरेगाव तालुका कृती समितीच्यावतीने प्रशासनाकडे गोरेगाव तालुका करण्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, अद्याप याकडे लक्ष न घातल्याने पुन्हा आज कृती समितीच्यावतीने भर पावसात मोर्चा काढून गोरेगाव तालुका निर्मिती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

गोरेगाव तालुका निर्मितीसाठी भरपावसात काढला मोर्चा

या आहेत गोरेगाव येथे सुविधा -

गोरेगाव, सवना, फाळेगाव, आजेगाव, बाभूळगाव हे पाच जिल्हा परिषद सर्कल व 10 पंचायत समिती सर्कल एक तालुका केल्यास, या भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे गोरेगाव येथील लोकसंख्या सतरा ते अठरा हजाराच्या जवळपास आहे. त्याचबरोबर गोरेगाव हे पाच जिल्हा परिषद गटाच्या मध्यवर्ती ठिकाण असून, येथे आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये पोलीस ठाणे, आरोग्य केंद्र, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, हायस्कूल महाविद्यालय, पोस्ट कार्यालय, टेलिफोन कार्यालय, विद्युत उपविभागीय कार्यालय, कृषी कार्यालय, दोन पेट्रोल पंप, दोन कृषी तंत्र विद्यालय, 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत. शासकीय जमीन आधी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. अशा संपूर्ण सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे गोरेगाव या गावाची तालुका निर्मिती झाल्यास खरोखर परिसरातील नागरिकांना सोईचे होऊन, अनेक शासकीय योजनेचा लाभ घेणे शक्य होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून, आज गोरेगाव तालुका निर्मिती करण्याच्या मागणीसाठी तालुका कृती समितीच्यावतीने भरपावसात मोर्चा काढला. संपुर्ण बाजार पेठ बंद ठेवून गावातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढत, गोरेगाव येथील चौफुलीवर रास्ता रोको केला व प्रशासनाला निवेदन दिले. या मोर्चामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details