महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी - Accidental death of sister-brother before brother-in-law in hingoli

भीषण अपघातामध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठी बहीण-मामा हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील ही घटना आहे. दिवाळीसाठी मामाकडे जात असताना हा अपघात झाला.

Accidental death of sister-brother in hingoli
हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी

By

Published : Nov 5, 2021, 12:24 PM IST

Updated : Nov 5, 2021, 1:44 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिवाळीचा सण म्हटले की नात्यांचा सण असतो. या सणाला घरातले सगळे एकत्र येत आनंदोत्सव साजरा करतात. पण याच आनंदाला हिंगोलीमध्ये मात्र धक्का बसला आहे. या आनंदावर विरजण घालवणारी घटना घडली आहे. येथे भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाने घाला घातला आहे.

हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी

दिवाळीसाठी जात होते मामाच्या गावी -

भीषण अपघातामध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठी बहीण-मामा हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील ही घटना आहे. दिवाळीसाठी मामाकडे जात असताना हा अपघात झाला.

मोठी बहिण मामाही जखमी -

या अपघातामध्ये आदर्श अरविंद सुरय्या (९) आणि कीर्ती सुरय्या (८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता नांदेड हलवण्यात आले आहे. टाकळगाव येथून वसमतकडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 16 यांनी मोटर सायकल MH 26 U 2957 ला जोरदार धडक दिली. त्यामुळे बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच आलेल्या मामा राजू खिलारे वय वर्ष 24 व मृत्यू झालेल्या मुलांची मोठी बहीण आरती सुरय्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वसमत तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

जिल्ह्यात हळहळ -

हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच मामाने घटनास्थळी धाव घेतली जखमी बहीण व भाऊजीला उपचारासाठी हलविले तर मयत कीर्ती, अरविंद यास शवविच्छेदनासाठी हलविले आहे. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशीच अन भाऊ बिजेच्या आदल्या दिवशी घटना घडल्याने संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Last Updated : Nov 5, 2021, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details