हिंगोली - हिंगोलीहून अहमदनगर नगर येथे विवाह समारंभासाठी निघालेल्या बसला अपघात झाला. मागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून गेल्याने बस चाळीस ते पन्नास फूट घासत गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हिंगोलीहून अहमदनगरकडे जाणाऱ्या खासगी बसची दोन्ही चाके निखळली; सुदैवाने जीवित हानी नाही - hingoli news
हिंगोलीहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अपघात झाला. मागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून गेल्याने बस चाळीस ते पन्नास फूट घासत गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल चोरमारे यांचा 1 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे विवाह होता. त्या विवाहासाठी हिंगोलीहून चोरमारे यांची मित्रमंडळी व काही महसूलचे कर्मचारी खासगी वाहनाने अहमदनगर मार्गे रवाना झाले होते. त्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीची चाके जालना-औरंगाबाद महामार्गावरील रामनगर निखळली. मात्र, बस चालकाच्या सतर्कतेमुळे बस चाळीस ते पन्नास फूट गेल्यावरही थांबवता आली.
बस घासल्यामुळे आत बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन्हीही चाके 400 ते 500 फूट लांब जाऊन पडली. सुदैवाने ह्या निखळून पडलेल्या चाकांमुळे दुसऱ्या गाडीचा अपघात झाला नाही. सुदैवाने जीवित हानी टळलीही असली तरी, प्रवासाला निघण्यागोदरच गाड्यांची देखभाल ही अतिबारकाईने करणे गरजेचे असल्याचेच या घटनेवरून समोर येत आहे.