हिंगोली- जिल्ह्यातील जामठी बु. येथे विवाह प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी गेलेल्या एकाचा अपघाती मृत्यू झाला. ओम कुंडलिक रत्नपारखी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ओम हा वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील रहिवासी आहे.
पाहुण्यांना रस्ता दाखविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू - on the spot
जिल्ह्यातील जामठी बु. येथे विवाह प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी गेलेल्या एकाचा अपघाती मृत्यू झाला. ओम कुंडलिक रत्नपारखी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ओम हा वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील रहिवासी आहे.
ओम दुचाकीने पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी जात असताना ऑटोशी समोरासमोर धडक झाली. या धडकेत तो जागीच ठार झाला. हिंगोली जिल्ह्यातील जामठी येथे एका विवाहा धूम-धाम सुरू असताना ओम यांना मुंबईवरून काही पाहुणे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओमने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना जामठी बु.ला जाणारा मार्ग सांगण्यासाठी गोरेगाव येथून एका तरुणाची दुचाकी घेतली आणि घटनास्थळी निघाला. मात्र, सेनगाव-गोरेगाव रस्त्यावरील निलडोह मार्गाजवळ त्याचा अपघात झाला.
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.