हिंगोली- स्वतःच्या वस्त्रावर मनीषा आय मिस यू, असे लिहून एका युवकाने कयाधु नदीपासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अद्याप युवकाचे नाव समजले नसले तरीही ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कयाधू नदी जवळ एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. युवकाने आत्महत्येपूर्वी मुलीचे नाव पँटवर लिहित मुलीच्या संबंधित कुटुंबाला शिक्षा झाली पाहिजे, असे देखील लिहिलेले आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मनीषा 'आय मिस यू'..असे वस्त्रावर लिहीत युवकाची आत्महत्या - हिंगोली गुन्हे बातमी
प्रेयसीचे स्वतःच्या कपड्यावर लिहित तिच्या कुटुंबियांना शिक्षा मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
संग्रहित छायाचित्र
पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटनास्थळी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली आहे घटनेचा पंचनामा सुरू असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत यबाबात कसलीही नोंद झाली नव्हती.
हेही वाचा -हिंगोली : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने तोडले मंदिराचे कुलूप