हिंगोली - कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यानुसार प्रशासन पूर्णपणे कोरोना रुग्णांकडे लक्ष ठेऊन आहे. कुणाला कोरोना झाला असेल तर नातेवाईकांनी त्या रुग्णाला बिनधास्त कोरोना वार्डमध्ये सोडाव बाकी आम्ही सर्व बघतो असे प्रशासनाने सांगितले असले तरी नातेवाईक रुग्णांना अजिबात सोडायला तयार नाहीत. कोरोना रुग्णासोबत आलेल्या एका नातेवाईकांनी अचानक रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलीय. आता नेमकी उडी का मारली, कोणासोबत आला होता याची चोकशी करणार आहोत, मात्र सर्व प्रथम त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जयवंशी कोरोना रुग्णाची बाब फारच गांभीर्याने घेतात. कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार सुरू आहेत की नाही तसेच रुग्णासोबत नातेवाईक आहेत का? याचाच आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी हे केव्हाही दाखल होतात. त्यांच्या भेटीत रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकाना विलगीकर कक्षात हलवितात. याची धास्ती नातेवाईकाना लागली आहे. आज जिल्हाधिकारी यांनी अचानक कोरोना वार्डला भेट दिली. जिल्हाधिकारी रुग्णालयात आल्याची माहिती पडताच कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाने थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. वैभव सरकटे असं या व्यक्तीच नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी अपघात विभागात हलविले. तो एवढा गंभीर झाला होता, त्याच्या पायाला व तोंडाला अन छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर डॉ. मंगेश टेहरे यांनी उपचार केले.