महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं'! या अवलियाने एक-दोन नव्हे, तब्बल ३२ वेळा लढवलीये निवडणूक - उत्तम कांबळे

आज लोकशाहीच्या व संविधानाच्या समानतेच्या हक्कानुसार देशातील सर्व नागरिक समान असून प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसारच कांबळे यांनी आतापर्यंत ७ वेळा ग्रामपंचायत, ४ वेळ पंचायत समिती, ४ वेळा जिल्हापरिषद, ३ वेळा तंटामुक्ती, ३ अमरावती विद्यापीठ निवडणूक, ६ वेळा विधानसभा, ४ वेळा अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणि लोकसभा ४ वेळा अशा आतापर्यंत ३२ निवडणुकींच्या रिंगणात उतरून त्यांनी भल्या भल्या करोडपतीला टक्कर दिली आहे. आता पुन्हा या लोकसभेसाठी ते हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून आपले नशीब आजमावत आहेत.

32 वेळा निवडणूक लढविणारा अवलिया

By

Published : Apr 12, 2019, 11:09 PM IST

हिंगोली- माणसाची कोणतेही ध्येय गाठण्याची इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्याची मनामध्ये जिद्द असेल, तर हमखास यश मिळतेच. मात्र, अनेकदा जिद्द असूनही यश मिळत नसेल आणि पुन्हा-पुन्हा तेच ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करत असेल, तर त्याला 'हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है' असाच डायलॉग म्हणावा लागेल.

32 वेळा निवडणूक लढविणारा अवलिया

असाच एक प्रयत्न शेंबाळपिंपरी गावातील व्यक्ती करत आहे. रोजमंजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा हा व्यक्ती वेगवेगळी निवडणूक लढवीत आहे. तेही एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३२ वेळा. यावर आपला विश्वास बसत नसेल. पण हो, हे खरे आहे. पाहूया याबद्दल ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट....

हिंगोली जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथील रहिवाशी असलेले उत्तम भगाजी कांबळे यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. काम करतील तेव्हाच पोटाची खळगी भरतील, अशी त्यांची परिस्थिती आहे. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद हमखास असतोच. कांबळे यांना छंद आहे, येणारी कोणतीही निवडणूक लढविण्याचा. निवडणूक लढवण्यास पैसा तर लागतोच. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे जरी खरे असले तरी निवडणूक अर्ज भरताना डिपॉझिट भरण्याची व्यवस्था नसतानादेखील अवघ्या ५०० रुपयातही निवडणूक लढविता येते हे कांबळे यांनी दाखवून दिले आहे.

उत्तम कांबळे (वय - ४७) यांचे एम. कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. ते २३ वर्षांपासूनच सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगार, विधवा, अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी ११ उपोषणे केली आहेत. कोणताही प्रश्न प्रशासनाकडे मांडण्यासाठी ते शासनदरबारी आजही खेट्या घेलतात. कांबळे यांनी विविध मागण्यांसाठी १२ लोकांचा पुसद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

समाज कार्यात सक्रीय असलेल्या कांबळे यांचा प्रत्येक निवडणुकीत अर्ज असतोच. आज लोकशाहीच्या व संविधानाच्या समानतेच्या हक्कानुसार देशातील सर्व नागरिक समान असून प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसारच कांबळे यांनी आतापर्यंत ७ वेळा ग्रामपंचायत, ४ वेळ पंचायत समिती, ४ वेळा जिल्हापरिषद, ३ वेळा तंटामुक्ती, ३ वेळा अमरावती विद्यापीठ निवडणूक, ६ वेळा विधानसभा, ४ वेळा अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणि लोकसभा ४ वेळा, अशा आतापर्यंत ३२ निवडणुकांच्या रिंगणात उतरून त्यांनी भल्या भल्या करोडपतींना टक्कर दिली आहे. आता पुन्हा या लोकसभेसाठी ते हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून आपले नशीब आजमावत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत पै-पै जमा करून, तर कधी शेळ्या विकून ते डिपॉझिट भरतात. एवढ्यातही डिपॉझिट झाले नाही, तर आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन ते पैसे भरतात. हा प्रकार प्रत्येक निवडणुकीत होतो. तर त्यांची प्रचार करण्याची पद्धतही वेगळीच आहे. एरवी उमेदवार प्रचारासाठी महागडी वाहने वापरतात. मात्र, कांबळे हे बसने प्रवास करतात आणि ज्या गावात रात्र होईल तिथे साग मुक्काम करतात. कुणाला जेवण मागतात तर सकाळ झाली की पुन्हा पुढील गावाकडे मार्गस्थ होतात. आतापर्यंत १८ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे ते सांगतात.

पैसा कुठून आला, असे विचारले असता निवडणूकीपूर्वी राबराब करून पैसा कमवितो आणि निवडणूकीसाठी वापरतो असे ते सांगतात. ३२ वेळा निवडणूक लढलो. पण एकदाही निवडून आलो नाही. परंतु मला विश्वास आहे, की जनता मला धोका देणार नाही. एक ना एक दिवस जनता मला हमखास निवडून देईलच. म्हणून मी कितीही वेळा हरलो तरी मला त्याचे काही वाटत नसल्याचेही कांबळे सांगतात.

एवढेच नाही, तर आपल्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ते निवडणूक विभागाच्या नेहमीच संपर्कात राहतात. त्यांना हातातील भोंगा लावून प्रचार करायचा असल्याने ते हिंगोली येथे निवडणूक विभागात माहिती घेण्यासाठी आले होते. हे सर्व करण्यासाठी मला घरच्यांचा विरोध होतो, मात्र मी घरच्यांना समजावून सांगतो, असेही कांबळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details