हिंगोली- दिल्ली येथील निजामुद्दिनमध्ये झालेल्या तबलिगी जमात संस्थेच्या मरकझ या कार्यक्रमात सहभागी असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून १२ नागरिक गेले होते, त्यापैकी एक जण परतला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाचे स्वॅबचे नमुने औरंगाबाद येथील वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
हिंगोलीत पुन्हा आढळला कोरोना संक्रमित; 'मरकझ'ला जाऊन आला होता रुग्ण - corona hingoli
जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित उपचार घेत आहेत. या दोघांचा अहवाल अजून आलेला नसताना निझामुद्दिन येथे मरकझच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णास रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित उपचार घेत आहेत. या दोघांचा अहवाल अजून आलेला नसताना निझामुद्दिन येथे मरकझच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णास रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून प्रशासनही नागरिकांना रस्त्यावर न निघण्याच्या सुचना देत आहे. तर, नगर पालिकेच्या वतीने भाजी मार्केट, दुकानांसमोर सोशल डिस्टंसिंगचा उपक्रम राबविला जात आहे. शिवाय, शहरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
हेही वाचा-हिंगोलीकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोना संशयित रुग्ण