हिंगोली - नववर्षाच्या तोंडावर जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्त आहे. अशाच परिस्थितीत हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात दोन गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नवीन वर्षाच्या तोंडावर घडल्याने गालबोट लागले आहे. तर त्या भागात तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. पंडित कच्छवे यांनी दिली.
तलवारीचा वापर
रिसाला बाजार हा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या भागावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असते. मात्र 30 डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक झाली. ही दगडफेक एवढी भयंकर होती, की यामध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, तलवारीचा ही वापर झाल्याने पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून, व्हिडिओ मध्ये जेजे दिसून येत आहेत, त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. तर आजूनही धरपकड सुरू असल्याचे कच्छवे यांनी सांगितले.