महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagar Panchayat Election 2021 : आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश करणे भोवले

कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर ( Case Against MLA Santosh Bangar ) यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ( Aundha Nagnath Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पंचायतीची निवडणूक ( Nagar Panchayat Election 2021 ) सुरु असताना मतदान केंद्रामध्ये अनधिकृतपणे ( Unauthorized Entry In Polling Station ) बांगर यांनी प्रवेश केला होता. याबाबत मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे.

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

By

Published : Dec 22, 2021, 9:44 AM IST

हिंगोली- जिल्ह्यातील सेनगाव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीची ( Aundha Nagnath Nagar Panchayat ) निवडणूक प्रक्रिया ( Nagar Panchayat Election 2021 ) सुरू असताना कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी ओंढा नागनाथ येथील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात कार्यकर्त्यांसह अनधिकृत प्रवेश केला ( Unauthorized Entry In Polling Station ). त्यामुळे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ( Aundha Nagnath Police Station ) मतदान केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांच्या तक्रारीवरून बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा ( Case Against MLA Santosh Bangar ) दाखल केला आहे.

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश करणे भोवले

अंगरक्षक व कार्यकर्तेही सोबत

राज्यात स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Election 2021 ) निवडणुका पार पडल्या त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली औंढा नागनाथ येथे मतदान सुरू असताना कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी भगव्या रंगाचा रुमाल गळ्यात घालुन अंगरक्षक व कार्यकर्त्यांना घेऊन अनधिकृत रित्या मतदान केंद्रात प्रवेश केला.

मतदान यंत्राशी झाली छेडछाड?

बांगर हे मतदान यंत्राजवळ जाऊन संपूर्ण बारकाईने पाहणी करत असल्याचे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ( MLA Santosh Bangar Viral Video ) दिसत आहे. त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रात छेडछाड केल्याची शक्यता नाकारताच येत नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार जी. डी. मुळे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details