हिंगोलो - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांपैकी ८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर, २ जणांचे अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे हिंगोलीकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर परदेशातून आलेल्या 11 जणांचा होम क्वारंटाईन कालावधी संपलेला आहे.
कोरोना अपडेट : 'त्या' संभाव्य व्यक्तींपैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह, दोघांचे अहवाल प्रलंबित
शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून दोन जणांचे अवहाल अजून प्रलंबित असल्याची माहिती आहे. तर, बाहेरुन आलेल्यांपैकी एकूण ११ व्यक्तींचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. परंतु, खबरदारी म्हणून या व्यक्तींना आपल्याच घरामध्ये दोन आठवडे राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने सर्वांनाच घाबरून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहून, प्रत्येकजण आपआपल्या जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे, याकडे लक्ष ठेऊन आहे. अशातच शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून दोन जणांचे अवहाल अजून प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. तर, बाहेरुन आलेल्यांपैकी एकूण ११ व्यक्तींचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तींना आपल्याच घरामध्ये दोन आठवडे राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. या व्यक्तींची कुठलीही आरोग्याची तक्रार असल्यास रॅपिड ऍक्शनच्या डॉक्टरला संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.