हिंगोली - दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने, हिंगोलीकरासह आरोग्य प्रशासनानही सुटकेचा श्वास घेत आहे. बुधवारी पुन्हा 8 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना टाळ्यांच्या गजरात जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्या 45 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये 7 जवान अन् सेनगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी आठजण कोरोनामुक्त, टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज - 8 more cured from corona in hingoli
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी आणखी 8 जण कोरोनातून बरे झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या आठही जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली होती. यातील आत्तापर्यंत 46 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 45 जणांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 91 झाली होती. यातील आत्तापर्यंत 46 रुग्ण बरे झालेले आहेत. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर परिचारिका आपल्या जीवाची जराही पर्वा न करता अथक परिश्रम घेत आहेत. त्याला दिवसेंदिवस यश येत असून, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी 8 बरे झालेल्या जणांना मोठ्या आनंदाच्या वातावरणात टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आजघडीला वार्डमध्ये एकूण 45 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 43 हे राज्य राखीव दलातील जवान, एक हा जालना येथील जवान आणि एका परिचारिका अशा एकूण असे 45 जणांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
कोणतीही गंभीर लक्षणे नसलेल्या 9 जवानांवर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपावेतो आयसोलेशल वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 1 हजार 402 व्यक्तींना दाखल केले होते. त्यापैकी 1 हजार 303 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर, 1 हजार 257 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला 135 व्यक्ती दाखल आहेत. तर, अजून 14 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले आहे.