महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिद्धेश्वर धरणाचे ८ दरवाजे उघडले; पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिद्धेश्वर धरणामध्ये आजघडीला २५१. ३८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या एकूण १३ दरवाज्यांपैकी ८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून ७ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाचे पाणी हे पूर्णपणे पूर्णा नदीमध्ये सोडण्यात आल्याने नदी लगत असलेल्या परिसरातील २२ गावांना हिंगोली प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

By

Published : Aug 16, 2020, 6:01 PM IST

सिद्धेश्वर धरण
सिद्धेश्वर धरण

हिंगोली- जिल्ह्यात ३, ४ दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यामुळे, येलदरी धरण १०० टक्के भरले आहे. म्हणून धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातील पाणी सिद्धेश्वर धरणात सोडण्यात आले. परिणामी सिद्धेश्वर धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ७ हजार ३०० क्युसेक पाणी पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या २२ गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

सिद्धेश्वर धरणाचे ८ दरवाजे उघडले

सिद्धेश्वर धरणामध्ये आजघडीला २५१. ३८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या एकूण १३ दरवाज्यांपैकी ८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून ७ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाचे पाणी हे पूर्णपणे पूर्णा नदीमध्ये सोडण्यात आल्याने नदीलगत असलेल्या परिसरातील २२ गावांना हिंगोली प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर येलदरी धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे येलदरी धरणालगत असलेल्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, आज सिद्धेश्वर धरणाचे पाणी देखील सोडण्यात आल्याने ते कोणकोणत्या शेतशिवारात शिरले याचा अंदाज लागलेला नाही.

हेही वाचा-हिंगोलीत मागील ३ दिवसांपासून संततधार; नदी-नाल्याकाठची पिके धोक्यात

ABOUT THE AUTHOR

...view details