हिंगोली -जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार 83 वर पोहोचली आहे, तर 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 232 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आता 1 ते 7 मार्च या कालावधीमध्ये संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 232 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी येत्या 1 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.