महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत पाच जणांची कोरोनावर मात; वजाबाकी झाली सुरू - हिंगोली कोरोना न्यूज

हिंगोली जिल्ह्यात 166 वर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला असून, 96 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 70 रुग्णावर विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

corona
कोरोना व्हायरस

By

Published : May 29, 2020, 8:20 AM IST

हिंगोली- दिवसेंदिवस वाढता कोरोनाचा आकडा हिंगोलीकरांची भीती वाढवत होता. मात्र, आता याच खळबळजनक परिस्थितीत पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने, पुन्हा प्रशासनासह हिंगोलीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना टाळ्यांच्या गजरामध्ये डिस्चार्ज देण्यात आला. आता 70 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

वसमत येथील कोरोना सेंटरमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते. ते मुंबईवरून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले होते. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या एका 42 वर्षे पुरुषाला कोरोनाची लागण झालेली आहे. तर दुसरी आनंदाची बाब म्हणजे याठिकाणी कोविर्ड वार्ड मध्ये उपचार घेणाऱ्या पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्या रुग्णांना गुरुवारी टाळ्यांच्या गजरामध्ये डिस्चार्ज देण्यात आलाय.

आता हिंगोली जिल्ह्यात 166 वर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला असून, 96 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 70 रुग्णावर विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी येथे 8, सेनगाव 12, हिंगोली 29 वसमत 11, अशी रुग्णांची संख्या आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. तसेच हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये दहा रुग्ण दाखल झाले आहेत.

आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 2110 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 1790 व्यक्तींचे अहवाल आलेत. त्यातील 1 हजार 691 व्यक्तींना सुट्टी देखील देण्यात आली आहे. गुरुवारी घडीला जिल्ह्यातील विविध आयसोलेशन वार्डमध्ये 412 व्यक्ती भरती आहेत. त्यापैकी 233 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर अजिबात न पडण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details