हिंगोली- जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरू आहे. शनिवारी हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण 43 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 815 वर पोहोचली आहे. तर 606 रुग्ण हे बरे झाले आहेत. सध्या 200 रुग्णांवर विविध कोरोनावार्ड, कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू असल्याची शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी सांगितले.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी अँटिजण तपासणीत सेनगाव येथे अगोदरच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 2, अन वटकळी येथे 1 असे 3 रुग्ण आढळले आहेत. तर ''आर टी पी सी आर टी'' चाचणीत वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 1, कोवठा रोड वरील भागात 1, शास्त्री नगर 1, ओंढा शहरात 1 असे चार असे एकूण 7 रुग्ण आढळले आहेत.