हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जेमतेम 4 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा रक्तपेढीमध्ये आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली येथे 'योग विद्या धाम' या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाहनाला हिंगोलीत चांगला प्रतिसाद, संचारबंदीतही 40 जणांचे रक्तदान - हिंगोली
कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्याच अनुषंगाने हिंगोलीत संचारबंदी आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या परिस्थितीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात स्वतःहून नागरिकांनी सहभाग घेतला.
![आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाहनाला हिंगोलीत चांगला प्रतिसाद, संचारबंदीतही 40 जणांचे रक्तदान hingoli blood donation हिंगोली रक्तदान शिबीर हिंगोली hingoli news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6572670-829-6572670-1585387025582.jpg)
कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्याच अनुषंगाने हिंगोलीत संचारबंदी आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या परिस्थितीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात स्वतःहून नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे संयोजकांच्या वतीने रक्तदात्याला घरून दुचाकीवरून आणले जात होते. रक्तदान झाल्यानंतर परत नेऊनही सोडले. रक्तदानस्थळी एक-एक मीटरवर खुर्च्या टाकून सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला.
यावेळी कोरोनाविषयी खबरदारी घेण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या शिबिरात 40 जणांनी रक्तदान केले आहे, तर या ठिकाणी 100 रक्तदाते जमा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. शिबिरास शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी भेट दिली.