महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत 33 जणांची कोरोनावर मात; जिल्ह्यात फक्त दहा बाधित रुग्ण

By

Published : May 16, 2020, 7:47 AM IST

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी ३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात फक्त १० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

हिंगोली कोरोना अपडेट
हिंगोलीत 33 जणांची कोरोनावर मात; जिल्ह्यात फक्त दहा बाधित रुग्ण

हिंगोली- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू असलेले 33 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयाच्यावतीने टाळ्यांच्या गजरात शुक्रवारी सुट्टी देण्यात आली आहे. एकदाच एवढे रुग्ण बरे झाल्यामुळे जिल्ह्यासह प्रशासनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव दलाच्या जवानांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवस-रात्र राबणाऱ्या परिचारिकेचा ही समावेश आहे. तसेच जालना येथील जवानाचा समावेश आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण बरे झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्याची वाटचाल आता ग्रीन झोनकडे जात असल्याचे दिसून येत आहे. आता केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलोशन वार्डमध्ये दहा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नऊ जवान हे औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील आयसोलेशनसह कोरोना केअर सेंटर मध्ये 1 हजार 425 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 311 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले होते त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 100 जण दाखल असून, 25 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधितरुग्ण हे बरे होत असल्याने, रुग्णालयात रात्रंदिवस राबणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details