हिंगोली -जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या तीन विधानसभा मतदार संघातील २१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
हिंगोलीतून शिवसेनेचे रामेश्वर शिंदे, कळमनुरीतून माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केलेल्या अॅड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांची कार्यक्षमताच भोवली, राजकीय विश्लेषकांचे मत
हिंगोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार -
तान्हाजी मुटकुळे (महायुती), भाऊराव पाटील (काँग्रेस), वसमीम अहेमद फहिम अहेमद (वंचित बहुजन आघाडी), विजय न्यानबा राऊत(प्रहार जनशक्ती पक्ष), विनोद केशवराव परतवार (अपक्ष), सुनील दशरथ इंगोले (बहुजन समाज पार्टी), स. कदिर स. मस्तान (अपक्ष), रमेश पुंजाजी धाबे (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया), सदाशिव यादव हटकर (बहुजन विकास आघाडी), प्रकाश महादू राऊत(अपक्ष), गणेश गोविंद वानखेडे (भारतीय जनसम्राट पार्टी), मुख्तारूद्दीन अझरूद्दीन शेख (अपक्ष), सुरेश मोहन गायकवाड(बहुजन समाज पार्टी), असराजी सुरेश चव्हाण (अपक्ष).