महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! हिंगोलीत राज्य राखीव दलाच्या 25 जवानांना कोरोनाची लागण - हिंगोली कोरोना अपडेट

गुरुवारी राज्य राखीव दलातील 25 जवानांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 45 वर गेला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जवानांना आयसोलेशल वार्डमध्ये हलवण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

Hingoli Corona Update
हिंगोली कोरोना अपडेट

By

Published : May 1, 2020, 11:11 AM IST

Updated : May 1, 2020, 11:26 AM IST

हिंगोली-संपूर्ण जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोनाचे हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी राज्य राखीव दलातील 25 जवानांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 45 वर गेला आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील जवानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस आकडा वाढत चालल्याने प्रशासन गतिमान हालचाली करत आहे. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जवानांना आयसोलेशल वार्डमध्ये हलवण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

Last Updated : May 1, 2020, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details