हिंगोली - मिळेल त्या मार्गाने, कसे बसे गाव जवळ करण्याच्या प्रयत्नात राजस्थानमधील मजूर राज्यात जागोजागी अडकत आहेत. पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे 200 लोकांना ताब्यात घेतले आहे. हे लोक एवढे मेटाकुटीला आलेत की, त्यांना समजून सांगण्यास गेलेल्या प्रत्येकाला ते पोटतिडकीने आमच्या गावी जायचे असल्याचे सांगत आहेत. साहेब आम्हाला केवळ परवानगी द्या, आम्ही आमच्या गावाला चालत जातोत. इतर देशातील लोकांना तुम्ही भारतात आणता, मग आमच्यावरच का असा अन्याय करत आहेत साहेब, अशा विनवण्या हे नागरिक अधिकाऱ्यांना करत आहेत.
'साहेब आम्हाला फक्त परवानगी द्या, आम्ही राजस्थानला पायी जातो..' - hingoli corona updates
संपूर्ण देशाममध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला नको म्हणून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यात अनेक मजुरदार वर्ग अडकला आहे.
संपूर्ण देशाममध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला नको म्हणून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यात अनेक मजुरदार वर्ग अडकला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, तसेच प्रशासन झटून कामाला लागले आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगाणा अन् हैदराबाद येथून जथेच्या जथे राजस्थान मार्गे रवाना झाले होते. ते कसे बसे वाशिमपर्यंत पोहोचले. मात्र, वाशिम पोलिसांना त्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारत पुन्हा हिंगोली मार्गे रवाना केले. त्यामुळे त्यांना कनेरगाव नाका येथे ताब्यात घेण्यात आले.
एवढ्या बारकाईने हे कामगार या आठ ट्रकमध्ये लपून बसले होते, ते सहजासहजी कुणाच्याही लक्षात येत नव्हते. यामध्ये 396 जण ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली अन् त्यांना एका विद्यालयात ठेवण्यात आले. यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू असताना पुन्हा दोनशे लोकांचा जथा हा कनेरगाव नाका येथेच आज पहाटे पकडण्यात आला आहे. यामध्ये काही महिला मजूर देखील आहेत. मात्र, हे सर्व मजूर चांगलेच संतापलेले होते. पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर मिळेल त्या रस्त्याने पळ काढत होते. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपासणीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. मात्र, हे मजूर एवढे कंटाळलेत की ते म्हणतात, आम्ही आमचे गाव पायी गाठतो. फक्त परवानगी ध्या. आमचे घरचे खूप प्रतीक्षा करीत आहेत दोन ते तीन दिवसांपासून पोटात अन्न नाही, आशा अनेक अडचणीचा ते पाढा वाचत आहेत. मात्र, परवानगी देताच येत नसल्याचे अधिकारी त्यांना सांगत आहेत. मात्र, यांना इतर जिल्ह्यातून कशी परवानगी दिली जात असावी हा देखील संशोधनाचा विषय आहे. आधीच ताब्यात असलेले मजूर पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहेत. तर, आता या दोनशे जणांची प्रशासन कुठे व्यवस्था करते याकडे लक्ष लागले आहे,