महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत 200 जणांची कोरोनावर मात; तर कतार देशातून आलेला 'तो' व्यक्ती पाॅझिटिव्ह

कतार देशातून औंढा नागनाथ तालुक्यात दाखल झालेल्या एका 26 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागल झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सदरील पुरुष दाखल झाला तेव्हापासून क्वारंटाईन होता.

200-corona-patient-discharge-in-hongoli
हिंगोलीत 200 जणांची कोरोनावर मात

By

Published : Jun 18, 2020, 12:17 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. तर मोठ्या संख्येने रुग्ण बरेही होत आहेत. बुधवारी जिल्ह्यात 200 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर 4 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासह एकूण रुग्णांची संख्या 233 वर पोहोचली आहे. त्यातील 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कतार देशातून औंढा नागनाथ तालुक्यात दाखल झालेल्या एका 26 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागल झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सदरील पुरुष दाखल झाला तेव्हापासून त्याला क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. तर कळमनुरी येथील सेंटरमध्ये दाखल झालेल्या एका 27 वर्षीय पुरुषांचा देखील अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. हा पुरुष दिल्लीवरुन कळमनुरी तालुक्यातील टव्हा या गावी आला होता. याशिवाय, कळवण तालुक्यातील येलकी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या 92 जवानांपैकी 88 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन अहवाल प्रलंबित आहेत.

हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या आठ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोना वर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 33 कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details