हिंगोली -जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथे सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्जेराव गणेश नाईक (12) आणि ध्रुपद गणेश नाईक (8), अशी मृत भावंडाची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुः खाचा डोंगर - दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हिंगोली
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथून जवळच असलेल्या तलावांमध्ये हे दोघे भावंड पोहण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता.
![तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुः खाचा डोंगर 2 brothers died hingoli hingoli latest news दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हिंगोली हिंगोली लेटेस्ट न्युज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6913848-thumbnail-3x2-ss.jpg)
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथून जवळच असलेल्या तलावांमध्ये हे दोघे भावंडं पोहण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, बालाजी जाधव, जीवन गवारे, शेख मदार यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून एका खासगी वाहनामध्ये औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.