हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सोमवारी टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. यामध्ये राज्य राखीव दलाचे 13 जवान आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे. हिंगोली येथून 15, तर औरंगाबादमधून 2 रुग्णांना सुट्टी दिली आहे.
दिलासादायक! हिंगोलीत एकाच दिवशी १७ रुग्ण कोरोनामुक्त - hingoli latest news
वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे हिंगोली जिल्हा शतक पूर्ण करते की काय ? अशी चिंता भेडसावत होती. मात्र, हळूहळू वजाबाकी सुरू झाली. आता एकदाच 17 रुग्ण बरे झाले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव दलातील जवान मालेगाव आणि मुंबई येथे बंदोबस्त आटोपून आल्यानंतर त्यांच्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. एवढेच नव्हे तर जवान उपचारासाठी प्रतिसाद देत नसून, रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्या आरोपाचे या जवानाकडून खंडन देखील करण्यात आले होते. हेच जवान कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये औरंगाबाद येथे उपचार घेत असलेले दोघे, तर हिंगोली येथे उपचार घेत असलेले 11 जवान, सेनगाव येथीस 1 आणि एका परिचरिकेचा समावेश आहे. या 17 जणांना टाळ्यांच्या गजरात सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत 71 रुग्ण कोरोनाबाधित असून यामध्ये 69 जवानाचा समावेश आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे हिंगोली जिल्हा शतक पूर्ण करते की काय ? अशी चिंता भेडसावत होती. मात्र, हळूहळू वजाबाकी सुरू झाली. आता एकदाच 17 रुग्ण बरे झाले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. जवानांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास, समादेशक मंचक इप्पर, डॉ. गोपाल कदम यांच्यासह रात्रंदिवस कोरोना कक्षामध्ये राबणारा स्टाफ उपस्थित होता.