महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 15 जण ताब्यात - Santosh Bhise

कळमनुरी तालुक्यातील पुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड मारली. या धाडीत 15 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच च भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही धाड मारून. या आरोपीकडील 7 हजार 200 रुपयांचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.

पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली

By

Published : Jul 31, 2019, 3:48 AM IST

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील पुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड मारली. या धाडीत 15 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर आरोपी कडील 7 हजार 300 रोख रक्कम आणि 19 हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण 26 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 15 जण ताब्यात

केशव वानखेडे, कमळाजी मार्कड, पुंडलिक वानखेडे, गणेश वानखेडे, जयकुमार वानखेडे, विकास वानखेडे, रावसाहेब वानखेडे, चंदू वानखेडे, पांडू वानखेडे, दत्ता घोंगडे, रवी इंगळे, सर्जेराव चीरमारे, चांदू मारोती वानखेडे, रघुनाथ बोचरे, रामराव किरवळे या सर्वांना ताब्यात घेतले आहे. तर गणपत वानखेडे हा पळून गेला.


कळमनुरी तालुक्यातील पूर परिसरात जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून धाड टाकण्यात आली. यावेळी 15 ते 16 जण जुगार खेळत असताना आढळून आले. यातील 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक जण मात्र पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपीकडून रोकड मोबाईल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात जुगाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अन् पथकाने दारूही पकडली


हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर याच भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही धाड मारली. या आरोपीकडील 7 हजार 200 रुपयांचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अजय भालेराव राहणार कळमनुरी याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details