हिंगोली - शहरातील विवेकानंद नगरातील 14 वर्षीय मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घडली. आता कोरोना पाठोपाठ डेंग्यूसदृश आजाराने या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरव अनिल खंदारे (14) अस मृत मुलाचे नाव आहे.
गौरवला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्याला हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार होऊनही त्याच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्याला झटके येत होते. त्यामुळे डॉक्टरने पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथे रेफर केले. मात्र, त्याला रस्त्यानेच रक्ताच्या उलट्या झाल्या. तशाच अवस्थेत त्याला नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही गौरव उपचाराला काही प्रतिसाद देत नव्हता.