महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2021, 5:13 PM IST

ETV Bharat / state

हिंगोली शहरातील 12 प्रभाग आणि 5 गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. हिंगोली शहरातील बारा प्रभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे प्रभाग आणि ग्रामीण भागातील पाच गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

Corona Rural Hingoli
कोरोना ग्रामीण हिंगोली

हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. हिंगोली शहरातील बारा प्रभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे प्रभाग आणि ग्रामीण भागातील पाच गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा पुन्हा हादरला आहे.

हेही वाचा -औंढा नागनाथ महाशिवरात्री महोत्सव रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

गांधी चौक, लक्ष्मी नगर, बियाणी नगर, तालाब कट्टा, कोमटी गल्ली, मारवाडी गल्ली, ग्रामीण पोलीस स्टेशन, शिवाजी नगर, विवेकानंद नगर, पोस्ट ऑफिस रोड, जिजामाता नगर, अशी हिंगोली शहरातील कंटेन्मेंट झोन घोषित केलेले प्रभाग आहेत. तर, ग्रामीण भागात समगा, सावरगाव बंगला, इंचा, काळकोंडी, जोडताळा ही गावे देखील कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांच्या हालचालींवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

नागरिक झाले भयभीत

कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढायला सुरुवात झाली, त्यामुळे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. ज्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्या त्या भागात प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या प्रभागात अनोळखी व्यक्तीला अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. सोबतच या भागातील नागरिकांच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा सज्ज

हिंगोली तालुक्यातील समगा, सावरगाव बांगला, इंचा, काळकोंडी आणि जोडताळा या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने, ही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांमधील हालचालींवर देखील आरोग्य यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. एकंदरीतच आता वाढत्या आकडेवारीवरून कोरोनाचा उद्रेक हा वाढत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा -कोरोनाचा फटका; लग्न समारंभासाठी घ्यावी लागणार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details