महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : हिंगोलीत राहुल गांधी यांना दिल्या देशी झाडांच्या 1 लाख बिया.. - Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra

( Bharat Jodo Yatra in Hingoli ) राहुल गांधी यांना निसर्गाची शाळा या उपक्रमाअंतर्गत बाल दिनानिमित्त अण्णाराव जगताप यांनी देशी वृक्षांच्या एक लाख बिया भेट म्हणून दिल्या आहेत. या बिया राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान पुढे वाटप करत जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 14, 2022, 9:16 PM IST

हिंगोली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रामध्ये आठवा दिवस आहे. आज पहाटे सहा वाजता हिंगोली शहरांमध्ये ही यात्रा दाखल ( Bharat Jodo Yatra in Hingoli ) झाली. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी परिसरातील गावातून अनेक नागरिक सहभागी झाले होते.

देशी वृक्षांच्या एक लाख बिया भेट - वृक्षांचे महत्त्व कळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांना निसर्गाची शाळा या उपक्रमाअंतर्गत बाल दिनानिमित्त अण्णाराव जगताप यांनी देशी वृक्षांच्या एक लाख बिया भेट म्हणून दिल्या आहेत. या बिया राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान पुढे वाटप करत जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

हिंगोलीत राहुल गांधी यांना दिल्या देशी झाडांच्या 1 लाख बिया
ग्रामीण भागातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग - भारत जोडो यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातून तर मोठ्या संख्येने अनेक मागण्या घेऊन या यात्रेमध्ये राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी हिंगोली शहरांमध्ये दाखल झालेले आहेत. राहुल गांधी यांना भेटून आमच्यावर होणारा अन्याय सांगण्यासाठी अनेक नागरिक हे यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details