हिंगोली- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच औंढा नागनाथ येथून जवळच असलेल्या वगरवाडीजवळ झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, तर १ युवतीगंभीर जखमी झाली आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले.
दुचाकी आणि पिकअपच्या धडकेत एक ठार, औंढा नागनाथजवळील घटना - हिंगोली दुचाकी अपघात
औंढा नागनाथ येथून जवळच असलेल्या वगरवाडीजवळ झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, तर १ युवतीगंभीर जखमी झाली आहे. आत्माराम रंगनाथ नवघरे (वय 19) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आत्माराम रंगनाथ नवघरे (वय 19) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, सुरेखा भीमराव मूळे (वय 18) असे जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे. हे दोघे औंढा मार्गे दुचाकीने जात होते. दरम्यान, वगरवाडी येथे वळणावर पिकअप आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील आत्माराम याच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो जागीच ठार झाला. तर, सुरेखा ही रस्त्यावर कोसळली.
घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी युवतीला औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. घटनेचा पंचनामा केला गेला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलविला. सुरेखाची प्रकृती फारच गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून तिला जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. यानंतर पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथे नेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.