महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मगो'सारखीच गोवा फॉरवर्डचीही अवस्था होईल - गिरीश चोडणकर

भाजप लोकांमध्ये जाऊन मते मागू शकत नाही. ते मतदानाला घाबरतात. कारण नितीमत्ता त्यांनी ठेवलेली नाही. लोकविश्वासाला पायदळी तूडवत आहेत. भविष्यात निवडणूक न लढवता आमदार पळवण्याचा धंदाच करतील. भाजपने मगोच्या बाबतीत केले. तेच गोवा फॉरवर्डच्या बाबतीत घडणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना माजी आमदार प्रताप गावस

By

Published : Mar 28, 2019, 1:11 PM IST

पणजी -भाजपने मगोच्या (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी) सिंहावर बसून विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर मगोचे आमदार आणि मतदारही नेले. याला मगोचे नेतृत्व जबाबदार आहे. त्याबरोबर आज मगोची जी अवस्था झाली आहे. तीच भविष्यात गोवा फॉरवर्डची होणार असल्याचे वक्तव्य गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला. माजी आमदार प्रताप गावस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

मतदारांनी दिलेला कौल नकारून मगोने भाजपला साथ दिली. त्याच जोरावर भाजपने त्यांचे आमदार फोडले. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पैशाचा वापर करून भाजप खालच्या स्तरावरील घाणेरडे राजकारण करीत आहे. त्यामुळे देशात गोव्याची बदनामी होत आहे. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे. त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहेत. लोकांचा कौल नाकारत आमदार चोरी करत असल्याने त्यांचेच लोक नाराज होत आहेत. तसेच लोकही राग व्यक्त करत आहे, असे चोडणकर म्हणाले.

भाजप लोकांमध्ये जाऊन मते मागू शकत नाही. ते मतदानाला घाबरतात. कारण नितीमत्ता त्यांनी ठेवलेली नाही. लोकविश्वासाला पायदळी तूडवत आहेत. भविष्यात निवडणूक न लढवता आमदार पळवण्याचा धंदाच करतील. भाजपने मगोच्या बाबतीत केले. तेच गोवा फॉरवर्डच्या बाबतीत घडणार असल्याचे ते म्हणाले.

सरदेसांईंचे भाकित खरे ठरले-

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी मतभेद असले तरीही २०१७ च्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले होते, जो भाजपसोबत जाईल तो संपणार आहे. ते आता खरे होताना दिसत आहे. मगोने भाजपला पाठिंबा दिला नसता तर ही परिस्थिती आज ओढावली नसती, असेही चोडणकर म्हणाले.

माजी आमदार प्रताप गावस यांची 'घरवापसी' -

माजी आमदार प्रताप गावस यांना २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, बुधवारी त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी त्यांचे स्वागत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details