महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी मंत्री रमेश तवडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश - ramesh tawadkar

मनोहर पर्रीकर सरकारमध्ये तवडकर यांच्याकडे क्रीडा आणि कृषी खाते होते. २०१७ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

रमेश तवडकर

By

Published : Feb 26, 2019, 10:19 PM IST

पणजी - माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आज ' भाजपमध्ये प्रवेश करत 'घर वापसी' केली. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यांचे स्वागत केले.दक्षिण गोव्यातील मडगाव येथे भाजपतर्फे युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते.

रमेश तवडकर

२०१२ मध्ये मनोहर पर्रीकर सरकारमध्ये तवडकर यांच्याकडे क्रीडा आणि कृषी खाते होते. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, सकाळी प्रदेश भाजप कार्यालयात समन्वय समिती कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी केंद्रीय संघटनमंत्री बी. ए. संतोष, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सरचिटणीस दामोदर नाईक, सदानंद तानवडे आदी उपस्थित होते.

बैठकानंतर तेंडुलकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ही नियोजित बैठक होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येणार आहे. त्या विषयी चर्चा करण्यात आली.

रविवारी भाजपचे शिरोड्याचे माजी आमदार महादेव नाईक यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा पोटनिवडणुकीत भाजपवर परिणाम होईल असे वाटते का? असे विचारले असता, तेंडुलकर म्हणाले, त्याचा भाजपच्या मतांवर फारसा परिणाम होणार नाही. मताधिक्यात ७०० ते ८०० चा फरक पडू शकतो. तर दुसरीकडे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचे मताधिक्य राहणार आहे. शिवाय नाईक हे काँग्रेसमधूनच भाजपात आले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details