महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावर्डे मतदारसंघात २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार - पावसकर - पणजी

सार्वजनिक बांधकाम विभागात कोठे कामे अडलीत याचा शोध घेणार, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभेचे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दीपक प्रभू पावसकर यांनी दिली.

दीपक प्रभू पावसकर

By

Published : Mar 28, 2019, 7:52 AM IST

पणजी- सावर्डे मतदारसंघातील लोकांना तीन वर्षांत २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार. त्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागात कोठे कामे अडलीत याचा शोध घेणार, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभेचे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दीपक प्रभू पावसकर यांनी दिली.

मगोमधून आमदार म्हणून निवडून आलेल्या पावसकर यांनी मंगळवारी पहाटे बाबू आजगावकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सुदिन ढवळीकर यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु, त्याच वेळी राज्यपाल डॉ. म्रुदुला सिन्हा गोव्याबाहेर असल्याने हा शपथविधी रात्री उशिरा साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला होता. शपथविधीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

गोवेकरांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार - पावसकर

शपथविधीनंतर बोलताना पावसकर म्हणाले, लोकांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे प्रकल्प मार्गी लावणार. हे करत असताना कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करणार. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मतदारसंघातील विकास कामासाठी २५ कोटी रुपये प्रत्येक आमदाराला विकास निधी दिला होता. त्याचा आढावा घेणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कसे वाटते? असे विचारले असता पावसकर म्हणाले, आमचे सावर्डे गाव पूर्वीपासून भाजपचे समर्थक आहे. येथे चांगले वाटत आहे. येणाऱ्या काळात दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अपेक्षित असलेला गोवा घडविण्याचा प्रयत्न करणार.

ABOUT THE AUTHOR

...view details