मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस सत्तास्थापनेसाठी सरसावली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसने भाजप सरकारपेक्षा आपल्याकडे मतांचे अधिक्य असल्याचा दावा राज्यपालांना पत्र लिहून केला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा - Goa governor
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूने तीव्र दु:ख झाल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूने तीव्र दु:ख झाल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शांततेने सत्ता स्थापण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारपेक्षा आमदारांचे सर्वात अधिक मताधिक्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी काँग्रेसला आमंत्रित करावे, अशी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने मागणी केली आहे.
असे आहे गोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस - १४
विधानसभा अध्यक्ष - १
राष्ट्रवादी - १
स्वतंत्र - ३
एमजीपी ३
भाजप - ११
गोवा फॉरवर्ड - ३