महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमचा भाजपला नव्हे पर्रिकरांना पाठिंबा : गोवा फॉरवर्ड - पणजी

मुख्यमंत्री पदावर कायम असल्याने नवा नेता निवडीची गरज नाही. मात्र, भाजपचा विधीमंडळ पक्षनेता निवडण्याची वेळ आलेली आहे. आम्ही पर्रीकर यांच्या सोबत आहेत. परंतु, भाजपच्या नव्हे.

छायाचित्र सौजन्य- ट्विटर

By

Published : Mar 17, 2019, 3:10 AM IST

पणजी- मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून आमचा पाठिंबा आहे, भाजपला नव्हे. पर्रिकर मुख्यमंत्री असल्याने नवा नेता निवडण्याची गरज नाही. मात्र, भाजपने आपला विधीमंडळ नेता निवडण्याची गरज आहे, असे विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी अफवा पसरली होती. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी त्यांच्या ताळगाव पठारावरील खासगी निवासस्थानी भेट घेऊन गेले. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर, अपक्ष आमदार गोविंद गावडे आणि आमदार प्रसाद गावकर आले होते. सरदेसाई म्हणाले, आम्ही सहाही जण एकत्र असून आमचा मुख्यमंत्री पर्रिकर यांनाच पाठिंबा आहे. पर्रिकर यांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा गोव्याच्या हितासाठी स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आम्ही पर्रिकर यांना प्रत्यक्ष भेटलो नाही. तसेच ते कृत्रिम श्वसन यंत्रणेवरही नाहीत. यापूर्वी अनेकदा ते गंभीर आजारातून उठून उभे राहिले आहेत.

या पार्श्वभूमीवर नवा नेता निवडण्याची गरज आहे काय, असे विचारले असता सरदेसाई म्हणाले, मुख्यमंत्री पदावर कायम असल्याने नवा नेता निवडीची गरज नाही. मात्र, भाजपचा विधीमंडळ पक्षनेता निवडण्याची वेळ आलेली आहे. आम्ही पर्रीकर यांच्या सोबत आहेत. परंतु, भाजपच्या नव्हे. जर काही निर्णय घेण्याची वेळ आली तर योग्य वेळी निर्णय घेणार. पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा राज्य सरकार घडवून आणण्यासाठी सरदेसाई यांनी प्रयत्न केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details