गोंदिया - देवरी तालुक्यातील डवकी येथील केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसह पालकामध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - जिल्हा परिषद
देवरी तालुक्यातील डवकी येथील केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली.
शाळेचा मागील काही दिवसांपासून स्लॅबचा काही भाग पडत होता. मात्र, आज अचानक स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला. त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते. या घटनेची माहिती मुख्याध्यपकांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र, त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.
गोंदिया जिल्ह्यातील एकूण ६८० वर्ग खोल्यांची स्थिती धोकादायक स्थितीत आहे. काही अनुसूचीत घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १ हजार ६५ शासकीय शाळा आहेत. यातील ४०४ शाळा आज घडीला धोकादायतक स्थितीत आहेत. अशा धोकादायक वर्गात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुदैवाने डवकी येथे झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.