गोंदिया - जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या शाळेतून बाहेर पडून पिंडकेपार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट वाघांच्या सान्निध्यात पर्यावरणाचे धडे गिरवले आहेत.
वाघांच्या गावात चिमुकल्यांची शाळा; जिल्हा परिषदेच्या शाळेचा अनोखा उपक्रम - ZP school organised their classes in forest
जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या शाळेतून बाहेर पडून पिंडकेपार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट वाघांच्या सान्निध्यात पर्यावरणाचे धडे गिरवले आहेत.
![वाघांच्या गावात चिमुकल्यांची शाळा; जिल्हा परिषदेच्या शाळेचा अनोखा उपक्रम ZP school organised their classes in forest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5296363-thumbnail-3x2-gondiya.jpg)
‘आमची शाळा-आदर्श शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग नागझिरा अभयारण्यात भरवले आहेत. हिरव्यागार जंगलाच्या कुशीतील शिक्षणाचा उपक्रम मुलांमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण करताना दिसतो. यातच औषधी वनस्पती आणि वन्यप्राण्यांची माहिती त्यांच्या ज्ञानात भर टाकत असल्याने या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
‘झाडे जगवा;वन्यप्रण्यांचे रक्षण करा, असं आवाहन नेहमीच विविध कार्यक्रमांमधून होत असतं. परंतु, याची जाणीव विद्यार्थ्यांना बालपणापासून झाली, तर पर्यावरण संतुलनासाठी याचा हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंगल सफारी करवण्यात आली. या दरम्यान विविध औषधी युक्त वनस्पतींची व प्राण्यांची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विष्ठेवरून प्राण्यांची कशी ओळख करता येईल, याचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले. मोह फुलाच्या झाडाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे धडे गिरवले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी जंगल परिसरातच विशिष्ट व्यंजन तयार करुन जेवणाचा आस्वाद घेतला.
TAGGED:
ZP school news from gondiya