गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात पोळ्याच्या दिवशी (18 ऑगस्ट) किरकोळ भांडणामुळे तरुणाची हत्या झाल्याची घटना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. आतिश बाळकृष्ण पाथोडे (वय 25 वर्षे, रा. श्रीरामटोली माल्ही ता.आमगाव), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गोंदिया : पोळ्याच्या दिवशी तरुणाची हत्या - गोंदिया गुन्हे बातमी
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात पोळ्याच्या एका तरुणाची हत्या झाली आहे. याबाबत आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आतिश पाथोडेचे रतोने कुटुंबाशी वाद झाला होता. यामुळे रतोने कुटुंबातील काही जणांनी आतिशला लाठ्यांनी मारहाण केली होती. यात तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी गांधी रामेश्वर रतोने (वय 28 वर्षे), संतकुमार रामेश्वर रतोने (वय 24 वर्षे), राधिका गांधी रतोने (वय 26 वर्षे, सर्व रा. श्रावणटोली माली ता. आमगाव) यांच्या विरोधात आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.