गोंदिया- गोंदिया शहरात एका 19 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीचा घाव घालत हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. रोहित उर्फ डायमंड डोंगरे (वय 19 वर्षे, रा. कटंगी टोला बुद्ध विहार, गोंदिया), असे मृत तरुणाचे नाव आहे.
Gondia : कुऱ्हाडीने घाव घालून एक तरुणाची हत्या - घरफोडी
गोंदिया शहरात एका 19 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीचा घाव घालत हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. रोहित उर्फ डायमंड डोंगरे (वय 19 वर्षे, रा. कटंगी टोला बुद्ध विहार, गोंदिया), असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत रोहित डोंगरे हा रविवारी (दि. 27 मार्च) रात्रीपासून बेपत्ता होता. सोमवारी (दि. 28 मार्च) सकाळी घराजवळ असलेल्या एका मैदानात रोहितचा मृतदेह आढळला. याबाबत नागरिकांनी राम नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर राम नगर पोलिसांसह पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
हेही वाचा -MPSC Passed Preeti Patle : चहावाल्याच्या मुलीचे यश! 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण;पहा कसा केला अभ्यास