महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना जनजागृतीसाठी तरुणाने सुरु केली महाराष्ट्र सायकल वारी, 3500 किमीचा प्रवास पूर्ण

देशातून कोरोना हद्दपार व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील तरुणाने सायकल चालवत जनजगृतीला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत त्याने 3500 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.

gondia cycle ride for awareness
जनजागृतीसाठी सायकल भ्रमंती

By

Published : Nov 26, 2020, 11:03 AM IST

गोंदिया - कोरोनाचे थैमान देशा सह राज्यात सुरुच आहे. कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. देशातुन तसेच राज्यातून कोरोना हद्दपार व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील एक तरुण अनोख्या पद्धतीने जनजागृती करतो आहे. आमरोळी गावातील २९ वर्षीय नितीन नांगनूरकर हा तरुण प्रत्येक जिल्ह्यात सायकल चालवत जनजागृती करतो आहे. या तरुणाने १८ ऑक्टोबरला सायकलचा प्रवास सुरु केला आहे.

नितीन चांदवड येथून निघून पहिला जिल्हा सातारा येथे पोहचला. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर सातारा, पुणे, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती चांदूर रेल्वे, चंद्रपूर, गडचिरोली, वडसा असा त्यांचा प्रवास सुरु आहे.

जनजागृतीसाठी सायकल भ्रमंती

जनजागृतीसाठी सायकल भ्रमंती..

सध्या नितीन गोंदिया जिल्ह्यात पोहचला आहे. त्याने आपल्या प्रवासात भेटलेल्या लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी माहिती देत जनजागृती केली आहे. एक महिन्यापूर्वी नितीनने सुरु प्रवास सुरु केला होता. आत्तापर्यंत त्याने ३५०० किलोमीटर अंतर ओलांडले आहे. इथून पुढे नितीन भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंद्धूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पनवेल, ठाणेसह मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात देखील जाणार आहे. नितीन यांची राहण्याची व जेवणाची सोय प्रत्येक जिल्हात जिल्हाधिकारी करत आहेत. तर तालुक्याच्या ठिकाणी तहसिदार व बीडीओ हे नितीनची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत आहेत, असे नितीन यांनी सांगितले. नितीन आपला सायकल प्रवास पूर्ण करत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना आमदार राजेस नरसिंगरागव पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे या तीन आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. लवकरच नितीन मुंबईला पोहचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

हेही वाचा -एनडीएच्या आमदारांना खरेदी करण्याचा लालूंकडून प्रयत्न; सुशीलकुमार मोदींचा दावा

हेही वाचा -मी अर्थमंत्रालयाला १२० नेत्यांची यादी पाठवतो; मग बघू कारवाई होते का - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details