महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला - गोंदिया चालत्या रेल्वेतून तरूण पडला

अचानक ट्रेन सुरू झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला.

gondia
नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला

By

Published : Dec 24, 2019, 12:15 PM IST

गोंदिया -चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना पाय घसरल्याने रेल्वे रुळांमध्ये पडलेल्या युवकाचे प्राण कर्तव्यवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले आहे. ही घटना गोंदिया रेल्वे स्टेशनची असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जखमी झालेल्या तरूणाचे नाव अमन सुरेंद्र वैद्य (वय २०) असून तो चिचगड बालाघाटचा रहिवासी आहे.

नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला

हेही वाचा -गोंदियात खंडणीसाठी आतेभावाने केली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची हत्या

बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसविण्यासाठी चढला होता. अचानक ट्रेन सुरु झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला. तो चालत्या रेल्वे गाडीच्या आत पडत असल्याचे बघता त्या ठिकाणी आपले कर्तव्य बाजातव असलेल्या रेल्वे सुरक्षा जवान चंद्रकांत बघेल यांना दिसताच त्यांनी लगेच त्याला ओढूत बाहेर काढले. नशीब बलवत्तर होते म्हणून तरूणाचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले .

ABOUT THE AUTHOR

...view details