गोंदिया - रेगाव तालुक्यातील सटवा येथे राहणाऱ्या लोकेश बिसेन (वय 31) या तरुणाचा कोरणीघाट येथे वाघनदीत बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाघनदीत आंघोळीला गेलेल्या तरुणाचा मृत्यू - flown and died in gondiya
रेगाव तालुक्यातील सटवा येथे राहणाऱ्या लोकेश बिसेन (वय 31) या तरुणाचा कोरणीघाट येथे वाघनदीत बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त लोकेश 4 ते 5 मित्रांसोबत रजेगाव येथील वाघ नदीवर आंघोळ करायला गेला होता. यावेळी नदीत उतरताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहत गेल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या मित्रांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर लोकेशचा शोध सुरू केल्यानंतर सायंकाळी 5 च्या दरम्यान त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. सध्या मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच यासंबंधी रावनवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.