गोंदिया:- राज्यात सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदिया संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षीकेने चक्क ब्लू टूथच्या माध्यमातून पेपर सोडवला. याचबरोबर परिक्षार्थीच्या ही कॉपी लक्षात आली.
TET EXAM PAPER : गोंदियात परिक्षार्थीने ब्लूटूथद्वारे सोडवला TET चा पेपर - आजच्या ताज्या बातम्या
राज्यात सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदिया संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षीकेने चक्क ब्लू टूथच्या माध्यमातून पेपर सोडवला.
आज TET चा पेपर होता. हा पेपर गोंदिया येथील संत तुकाराम शाळेमध्ये चालू असताना रूम नंबर 5 मध्ये एका मुलीने ब्लूटुथ लावून पेपर सोडवण्याची तक्रार केली होती. त्यामुळे परिक्षागृहात बराच गोंधळ उडाला. पोलिसांना बोलावण्यात आले. प्रत्येक परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्याची परवानगी नसते. मग या मुलीजवळ ब्लूटूथ कसा आला. सेंटरवर चेकिंग झाली नाही का ? चेकिंग झाली तर ब्लूटूथ का दिसला नाही ? हे हाही विचार करणारा प्रश्न आहे. टीईटी परीक्षा देणारे म्हणजे भावी शिक्षक असतात. जे शिकवणारे आहेत त्यांनी जर असे प्रकार केले तर काय देशाचे भविष्य घडणार असा प्रश्न चिन्ह देखील निर्माण होतो. मुलीच्या तक्रारीवरून जबाब नोंदवण्यात आले. व आता त्या मुलीवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -Mumbai Crime Branch Seized Drug : मुंबईत 5 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त, एका आरोपीला अटक