महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत यवतमाळची प्रणाली निघाली महाराष्ट्र भ्रमणावर - यवतमाळ प्रणाली चिटके न्यूज

पर्यावरणाचे महत्व समजवण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून २१ वर्षाची प्रणाली चिटके आज ( ता. २८) गोंदियामध्ये पोहोचली. गोंदिया येथील संडे टीमने तिचे स्वागत करत गौरव केला.

yavatmal girl pranali chikte starts to maharashtra tour with bicycle for save environment message
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत यवतमाळची प्रणाली निघाली महाराष्ट्र भ्रमणावर

By

Published : Dec 28, 2020, 7:06 PM IST

Updated : Dec 28, 2020, 10:05 PM IST

गोंदिया- पर्यावरणाचे महत्व समजवण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून २१ वर्षाची प्रणाली चिटके आज ( ता. २८) गोंदियामध्ये पोहोचली. गोंदिया येथील संडे टीमने तिचे स्वागत करत गौरव केला. तसेच तिला पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

कोण आहे प्रणाली

प्रणाली ही यवतमाळ जिल्ह्यातील वाणी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या छोट्याशा पुनवट या गावाची रहिवाशी आहे. तिचे वडील शेतकरी असून तिला दोन मोठ्या बहिणी आहेत. प्रणाली ही घरची सर्वात छोटी मुलगी आहे. तिने आई-वडीलांची समजूत काढून त्यांची परवानगी घेत ती सायकलने महाराष्ट्र भ्रमण करत पर्यावरणाचा संदेश देत आहे.

काय आहे प्रणालीचा संदेश

मानवी जीवन शैलीमुळे पर्यावरण असंतुलीत झाले आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाणी, हवा व झाडांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात ऊन, थंडीत ऊन, एवढेच नाहीतर वर्षभर अनैसर्गिक पाऊस पडत असतो. हे ग्लोबल वार्मिंगचे संकेत आहे. ज्यामुळे मानव, प्राणी, पक्षीही असुरक्षित बनले आहेत. याला वाचविणे खूप आवश्यक झाले आहे. पर्यावरणाचे संरक्षण कशाप्रकारे केले जाईल, याचे महत्व व संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने मी संपुर्ण महाराष्ट्रभर सायकल प्रवास करण्यासाठी निघाली आहे, असे प्रणालीने सांगितलं.

प्रणाली चिटके बोलताना...

उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंची घेणार भेट

प्रणालीने हा प्रवास ४ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून सुरू केला. ती चंद्रपुर, वर्धा, नागपुर, भंडारा होत आज गोंदियामध्ये पोहोचली आहे. ती दररोज ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करते व जिथे रात्र झाली, तेथे सुरक्षित जागा पाहून रात्रीचा मुक्काम करते. त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणाचा संदेश ती या प्रवासादरम्यान, नागरिकांना देत आहे. प्रणाली अशाप्रकारे संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास करणार असून शेवटी ती मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. या भेटीत महाराष्ट्राच्या पर्यावरणाबद्दलची माहिती सांगणार असल्याचे प्रणालीने सांगितले.

माझ्या या प्रवासाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी शेतकऱ्याची मुलगी असल्याने मला ग्रामीण जीवनाची चांगली समज आहे. त्यामुळे या प्रवासात अडचणी येत नाहीत, असे देखील प्रणालीने सांगितले. गोंदियामध्ये आज तिचे स्वागत करण्यात आले आणि तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.


हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी
हेही वाचा -सकारात्मक..! 'रेस्ट झोन' गोंदियामध्ये नक्षल चळवळ मंदावतेय; गेल्या वर्षभरात एकही हिंसक घटना नाही

Last Updated : Dec 28, 2020, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details