गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यांतर्गत येत असलेल्या कारुटोला ग्रामपंचायतीअंतर्गत सलांगटोला या गावी अवैध दारू विक्री अड्ड्यावर गावातील महिलांनी हल्लाबोल करून दारू ताब्यात घेतली. पोळ्यादिवशी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यावर नजर ठेवून त्याच्या घरातील दारूसाठा ताब्यात घेतला.
सलांगटोला गावच्या महिलांनी अवैध दारू विक्रेत्याच्या घरातून दारू घेतली ताब्यात - gondia crime news
सलांगटोला या गावात अवैध दारूविक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी याची माहिती यापूर्वी पोलिसांना दिली होती. मात्र, अवैध दारू बंद झालीच नाही. अखेर पोळ्याच्या सणाच्या दिवशी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेता अजय हेमनेवर नजर ठेवून त्याच्या घरावर छापा टाकला.
सलांगटोला या गावात अवैध दारूविक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी याची माहिती यापूर्वी पोलिसांना दिली होती. मात्र, अवैध दारू बंद झालीच नाही. अखेर पोळ्याच्या सणाच्या दिवशी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेता अजय हेमनेवर नजर ठेवून त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून अवैध दारूच्या बाटल्या बाहेर काढून याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, अवैध दारू विक्रेता हेमने घरातून अगोदरच पळाला होता. तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंद सालेकसा पोलीस ठाण्यात केली असून अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. सालेकसा पोलीस पुढील तपास करत आहेत. यावेळी गावातील महिलांनी निषेध व्यक्त करून कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.