गोंदिया - जिल्ह्याची आदिवासी बहुल तथा नक्षलग्रस्त अशी ओळख आहे. या जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने अनेक ग्रामीण भागातील गोर-गरीब नागरिक शेतीवर आपले जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे एखादा छोटा-मोठा उद्योग करायचं म्हटलं तर भांडवल कुठून आण्याचं असा प्रश्न या ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना पडतो. मात्र आता या लोकांना गोंदिया नाबार्ड व विदर्भ कोकण ग्रामीण बँकद्वारे महिलांनी व्यवसायाभिमुख व्हाव्यात यासाठी छोटा-मोठा उद्योग उभारण्यासाठी कर्ज दिले जाणारा आहे. त्यामुळे पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांचा रोजगाराभिमुख बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज - नाबार्ड व कोकण ग्रामीण बँकेच्या मदतीने महिलांना कर्ज
ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळणार आहे. नाबार्ड व कोकण ग्रामीण बँकेच्या मदतीने महिला व्यवसायाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील १० हजार कुटूंबियांना कर्ज मिळणार आहे.
गोंदिया जिल्हा नाबार्ड व विदर्भ कोकण बँकेद्वारे जिल्ह्यातील १० हजार कुटूंबियांना छोटे-मोठे उद्योग करण्यासाठी आता भांडवल उपलब्ध करून देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून संपूर्ण जिल्ह्यातील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेतील अधिकाऱ्यांना आज गोंदिया पंचायत समिती येथे बोलावून ग्रामीण भागातील लोकांना छोट्या-मोठ्या उद्योगासाठी कसे कर्ज वितरित करता येतील. यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या असून यामध्ये पाच महिलांच्या समूहाला हे कर्ज दिले जाणार असून गोंदिया जिल्ह्यातील १० हजार कुटूंबियांना हे कर्ज दिले. जाणार आहे त्याच प्रमाणे हे लोन घेताना बँकेत महिलाना आपले छोटे-मोठे उद्योग सुरु करून आत्मनिर्भर बनण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.