गोंदिया- भाऊ आला बहिणीसाठी धाऊन, ही म्हण आजही आपल्याला पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे चूल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील महिला आता आत्मनिर्भरतेचे धडे घेत आपल्या भावाचा मदतीने गिरवू लागल्या आहेत. रोशन शिवणकर या युवकाने आपल्या बहिणींसाठी युवा नेटवर्क मैत्री मंचच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल पुरवून प्रशिक्षण दिले असून या महिलांनी आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. त्या आता विक्रीसाठी उपलब्धही झाल्या आहेत. तर कसे तयार झाल्या ह्या राखी व्यवसायतून आपल्या बहीणींना आत्मनिर्भर तर बघू या 'ईटीव्ही भारत'चा विशेष वृत्तांत...
राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून गावातील आपल्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करण्याचा संकल्प युवा मैत्रीण ग्रूपच्या माध्यमातून रोशन शिवणकर या तरूणाने केला आहे. महिलांच्या हाताला काही काम मिळावे म्हणून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राखी तयार करण्याचा मानस व्यक्त केला. त्याचे मत सर्वांना पटले व ना नफा ना तोटा या तत्वावर काम करण्याचा निर्धार केला. राखी तयार करण्यासाठी कच्चा माल शिवणकर यांनी गावातील महिलांना उपलब्ध करून दिला.
चाळीस हजार रुपयांची केली गुंतवणूक
रोशन शिवणकर ५ नोव्हेंबर, २०१६ रोजी यांनी युवा नेटवर्क मैत्री मंचची स्थापना करून महिलांनी एकत्र केले. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले. २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रम व सेवाभावी कार्य मंचच्या माध्यमातून करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणजे मंचच्या संयोजिका गायत्री इरले यांनी महिलांच्या हाताला काही काम मिळावे म्हणून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राखी तयार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांचे मत सर्वांना पटले व ना नफा ना तोटा या तत्वावर काम करण्याचा निर्धार केला. राखी तयार करण्यासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी ३० हजार रुपये व राखी पॅकिंग साहित्यासाठी १० हजार रूपये, अशी ४० हजार रूपयांची गुंतवणूक शिवणकर यांनी केली.
महिला झाल्या आत्मनिर्भर
या राखी व्यवसायामुळे कोरोना काळात उदरनिर्वाहासाठी पुरुषांना महिलांचा थोडा फार हातभार लागत असून सौंदडसारख्या गावखेड्यात तयार केलेल्या राखीला महिलांची पसंती मिळत आहे. यामुळे राखी व्यवसायातून महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला. ग्रामिण भागातील महिलांना राखीपासून आपली सुरुवात केली आहे. मात्र, त्या फक्त एवढ्यावरच थांबणार नसून वर्षभर साजरे होणारे सण व उत्सवात उपयोगी साहित्य निर्मितीचे नियोजन मंचने केले आहे. राखी, रांगोळी, आकाशकंदील, बांगड्या निर्मिती, कापड शिलाई व घर सजावटीचे इतर साहित्य निर्मितीचे काम सुरू करण्याची तयारी या महिलांनी सुरू केली आहे. आत्मनिर्भर महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून अर्थोत्पादनासह महिलांचे कला-कौशल्य या अनुषंगाने विकसित होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. लवकरच त्यांनी तयार केलेल्या राख्यांच्या प्रदर्शनीही भरवण्यात येणार असून विक्रीसाठी या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा -भात पिकवणाऱ्या जिल्ह्यात आता ड्रॅगन फळाची शेती, ईटीव्ही भारतचा विशेष आढावा