गोंदिया- ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बरबसपुरा ते आंभोराकडे जाणा-या मार्गावरील कालव्याच्या पुलाखाली 7 मे रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आता या मृताची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मृताच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
मुलचंद गोमाजी शहारे रा. कारंजा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, तो मागील ४ महिन्यांपासून टेमनी येथे सासऱ्याकडे राहात होता. ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कटंगी येथे जातो म्हणून तो घरातून निघाला असे त्याच्या सासरच्या लोकांनी पोलिसांना सांगितले होते. परंतु, पोलिसांनी या संदर्भात तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. मृताच्या पत्नीचे टेमणी येथील शेजारी राहणा-या सुरेश सिताराम नागरिकर याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळेच मुलचंदची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.