महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 29, 2020, 1:15 PM IST

ETV Bharat / state

गोंदिया : अदानी प्रकल्पातील इंजिनीयरच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

तिरोडा तिरोडा येथील एमआयडीसीमधील अदानी पॉवर लिमिटेडच्या वीज प्रकल्पात कार्यरत असलेल्या एका इंजिनीयरच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अदानी येथील इंजिनीयर च्या पत्नीची आत्महत्या
अदानी येथील इंजिनीयरच्या पत्नीची आत्महत्या

गोंदिया -जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या अदाणी प्रकल्पातील एका इंजिनीयरच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जानकी लक्ष्मी (वय 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

जिल्ह्याच्या तिरोडा येथील एमआयडीसीमधील अदानी पॉवर लिमिटेडच्या वीज प्रकल्पात कार्यरत असलेले इंजिनीयर वेणू कोटया सिलिबरी यांनी तिरोडा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ते पंखा बाडा बाजार वाढ तेलंगणा येथील रहिवासी आहेत. ते पत्नी जानकीसह नेहरू वार्ड तिरोडा येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. दरम्यान, 27 जून रोजी ते दुपारी दोन वाजता ते अदानी वीज प्रकल्पात कर्तव्यावर गेले. यावेळी त्यांची पत्नी घरात एकटी होती. संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचे दार बंद असून लाईटही बंद आहेत असे सांगितले. यावर त्यांनी आपल्या पत्नीला दोनदा फोन केला. मात्र, तिने फोन रिसीव्ह न केल्याने ती कदाचित झोपली असवी असे समजून परत फोन केला नाही. मात्र, रात्री नऊ दरम्यान त्यांच्या अन्य एका शेजाऱ्यानी त्यांना मोबाईलवरून त्यांच्या घरातील लाईट बंद असून दारही बंद असल्याचे सांगितले. यानंतर सिलिबरी संध्याकाळी 9.30 दरम्यान आपली ड्युटी पूर्ण करून घरी परत आले. त्यांनी पत्नीला आवाज देऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या सहाय्याने घराचे दार तोडून त्यांनी आत प्रवेश केला असता त्यांच्या पत्नीने ओढणीने घरच्या सीलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.

याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तिरोडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवण्यात आले. मात्र, ही आत्महत्या का केली असावी याचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे. तर, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details