गोंदिया - 'रमजान ईद' मुळे 5 आणि 6 जूनला जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश गोंदियाच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तंबी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीच मद्य विक्री बंदीचे आदेश मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्हातील सर्व मद्य विक्री दुकाने 'रमजान ईद'च्या दिवशीही सुरुच होती.
'ईद'च्या दिवशीही गोंदियात मद्यविक्री सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नागपूर खंडपीठाचा खो - मुबई उच्च न्यायालय
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हातील मद्य विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हातील मद्य विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. यावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांच्या पीठासमोर सुनावली झाली. संबंधित आदेश अवैध असल्याचे आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांवर 25 हजार रुपयांचा दावा खर्च बसविन्यात येईल, अशी तंबीदेखील न्यायालयाने दिली आहे. या तंबीची माहिती पोहोचताच जिल्हाधिकाऱ्यांनी आपले आदेश मागे घेतले आहेत.
यात विशेष बाब अशी, की गोंदिया जिल्हाधिकाऱयांसोबतच नागपूर आणि अकोलाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील असा आदेश काढला होता. मात्र, न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांनी देखील आदेश मागे घेतला आहे.